Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

Suraj Chavan movie :आला रे आला ‘झापुक झुपक’ चा हिरो आला ………….

 Suraj Chavan Zapuk zupuk movie release Date:बिग बॉस मराठी चा विजेता सुरज चव्हाण याचा ‘झापुक झुपक’ हा चित्रपट येत्या 25 एप्रिल ला दर्शकांच्या भेटीसाठी येत आहे .सूरज चव्हाण यानं बिग बॉस मराठीचं विजेतेपद पटकावल्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘झापुक झुपक’ ची घोषणा केली होती .बिग बॉस मराठी ५” विजेता आणि प्रसिद्ध रीलस्टार सुरज चव्हाण याची मुख्य भूमिका असलेल्या “झापुक झुपूक” चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर रीलिज झाले आहे .



बाईपण भारी देवा या चित्रपटाच्या भरगोस यशानंतर दिग्दर्शक ‘केदार शिंदे’ यांनी हा सिनेमा हाती घेतला आहे.चित्रपटाबद्दल आपल्या भावना व्यक्त करत दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले की,”सूरज चव्हाण यांच्या बरोबर बिग बॉस मराठी जेंव्हा केलं तेंव्हाच मला वाटलं की, माझ्याकडे जी एक गोष्ट आहे त्यासाठी हाच उत्कृष्ठ कलावंत आहे.मला खात्री आहे की झपुक झुपूक व्दारे आम्हीं ही प्रथा अशीच सुरु ठेवू.आता जो चित्रपट लोकांसमोर येईल तो संपूर्ण प्रेक्षक कुटुंबाचं मनसोक्त मनोरंजन करेल, असा मी एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे’.



सूरज चव्हाण बरोबरच जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे मुख्य भूमिकेत झळकणार असून सध्या चित्रपटाचे शुटिंग सुरु आहे.

Post a Comment

0 Comments