Lakhpati Didi Yojana 2025:लाडकी बहीण' योजनेप्रमाणेच 'लखपती दीदी' योजनेबाबतही राज्यात सध्या चर्चा आहे. लाडकी बहीण योजनेचा राज्यातील अनेक महिलांना लाभ मिळाला या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याचे दीड हजार रुपये मिळतात . नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये नुकताच या योजनेबाबतचा कार्यक्रम जळगावमध्ये झाला. या योजनेनुसार महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी 1 ते 5 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते.
काय आहे या योजनेची पात्रता ?
लखपती दीदी योजनेची पात्रता या अटी खालीलप्रमाणे आहेत,
- या योजनेसाठी फकत महिलाच अर्ज करू शकतात.
- लाभार्थी महिला संबंधित राज्याची रहिवाशी असावी.
- त्या महिलेचे वार्षिक उत्पन्न तीन लोकांपेक्षा कमी असावे.
- महिलेचे वय १८ हे ५० दरम्यान असावे.
- संबंधित महिला बचत गटाची सदस्य असावी.
या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
- पासबुक
- पासपोर्ट फोटो
- मोबाईल नंबर
अर्ज कसा करणार?
लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना 'स्वयं मदत गट' व्यवसाय योजना तयार करावी लागेल. व्यवसायाचा आराखडा तयार झाल्यानंतर बचत गट योजना आणि अर्ज सरकारकडं पाठवण्यात येईल.सर्व पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र होतील.
.png)
0 Comments