Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

स्वतःच्या मालकीचं पक्के घर बांधण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण ,प्रधानमंत्री आवास योजनेची मुदत वाढली....

PM Awas Yojana 2025:पीएम आवास योजना १ जून २०१५ रोजी सुरू करण्यात आलेली आहे .पीएम आवास योजना शहरी, तसेच ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रित करून भारतातील घरांची कमतरता दूर करण्याचे उद्दिष्ट ठेवते.ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना घरे देऊन लाभ देते.या योजनेचा लाभ घेऊ इच्छित लोकांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे . या यौजनेची मुदत केंद्र सरकारने ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवलेली आहे . त्यामुळे आता आपल्या स्वप्नातील घर घ्यायची इच्छा पूर्ण होणार आहे . 

प्रधानमंत्री आवास योजनेचे दोन घटक खालीलप्रमाणे आहेत:

प्रधानमंत्री आवास योजना शहरी (PMAY-U)

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G)


प्रधानमंत्री आवास योजनेची पात्रता  काय आहे ?

  1. अनुसूचित जमाती (एसटी) / अनुसूचित जाती (एससी)
  2. निवारा नसलेली घरे. 
  3. कामगार, शहरी गरीब (रिक्षाचालक, रस्त्यावरील विक्रेते, इतर सेवा प्रदाते इ.), औद्योगिक कामगार आणि EWS/LIG विभागातील स्थलांतरित.
  4. कायदेशीररित्या मुक्त झालेला बंधुआ कामगार
  5. सफाई कामगार 


प्रधानमंत्री आवास योजनेची फायदे  काय आहे ?

  1. या योजने अंतर्गत शहरी  लाभार्थ्यांना स्थानानुसार ३० चौरस मीटर ते ९० चौरस मीटर कार्पेट एरियाचे स्वतःचे घर मिळेल,तसेच शहरी  लाभार्थ्यांना किमान २५ चौरस मीटर आकाराचे स्वतःचे घर मिळेल. 
  2. स्वच्छ भारत मिशन (G) कडून शौचालय बांधण्यासाठी पीएमएवाय-जी अंतर्गत लाभार्थ्यांना १२,००० रुपयांची मदत मिळेल
  3. पीएमएवाय-यू अंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्येक ईडब्ल्यूएस घरासाठी १.५ लाख रुपयांची केंद्रीय मदत मिळेल.
  4. पीएमएवायच्या लाभार्थ्यांना प्राथमिक कर्ज देणाऱ्या संस्थांकडून (पीएलआय) घरे खरेदी करण्यासाठी किंवा नवीन बांधकामासाठी गृहकर्जांवर व्याज अनुदान मिळेल.
  5. या योजनेमुळे  शहरांमधील झोपडपट्ट्या कमी करण्यास मदत करेल. 


या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील ?

PMAY-शहरी 
  • आधार कार्ड .
  • कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड .
  • सक्रिय आधार-लिंक्ड बँक खात्याचे पासबुक .
  • उत्पन्नाचा पुरावा.
  • जमिनीचा कागदपत्र

PMAY-ग्रामीण 
  • आधार कार्ड.
  • MGNREGA नोंदणीकृत जॉब कार्ड.
  • बँक खात्याची माहिती.
  • स्वच्छ भारत मिशन (SBM) क्रमांक.
  • लाभार्थी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडे पक्के घर नाही हे दर्शविणारे प्रतिज्ञापत्र.


योजनेसाठी खालील वेबसाइट वर करावा अर्ज :
PMAY-ग्रामीण :https://pmay-urban.gov.in/





Post a Comment

0 Comments