पावसाळा हा सर्वानाच आवडता ऋतू आहे.कडक उन्हाळ्यानंतर पाऊस प्रेमी अत्यंत आतुरतेने पावसाची वाट पाहत असतात,तसेच या वर्षी पावसात कुठे जायचं हा पण प्रश्न सगळ्यांना पडतो.आपल्या महाराष्ट्राचे पावसाळ्यातील सौन्दर्य हे अगदी मोहक असते. भारतातील इतर राज्यातून नाही तर परदेशातूनही पर्यटक महाराष्ट्रात फिरायला येत असतात. महाराष्ट्रात पावसाळ्यात फिरण्यासाठी काही सुंदर टिकणे खालील प्रमाणे आहेत.
१. लोणावळा -खंडाळा (Lonalavala /Khandala):
लोणावळा आणि खंडाळा हि टीकाणे पावसाळ्यात फिरण्यासाठी अत्यंत लोकप्रिय आहेत. येते तुम्हाला विविध धबधबे आणि सुंदर डोंगरांचा आनंद घेता येईल. लोणावळा येथील "टायगर पॉईंट"वर तर पर्यटकांची तुफान गर्दी पाहायला मिळते. तसेच लोणावळ्यात लोहगड हा किल्ला देखील ट्रेकिंसाठी सुंदर आहे .
२. महाबळेश्वर /पांचगणी (Mahabaleshwar/Panchgani):
महाबळेश्वर हे थंड हवेच म्हणून ठिकाण संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात देखील महाबळेश्वर पांचगणी आणि वाई हि ठिकाणे फिरणायसाठी अगदी सुंदर आहेत . पांचगणी मध्ये तुम्हाला वेगवेगळे प्पॉईंट्स पाहायला मिळतील. तसेच महाबळेश्वर मधील "एलिफण्ट पॉईंट" आणि इत्तर काही सुंदर ठिकाणे पाहायला मिळतात
३. ताम्हिणी घाट(Tamini ghat):
पूण्यातील ताम्हिणी घाट हे निसर्गप्रेमींचे अगदी आवडी चे ठिकाण आहे . विविध धबधबे ,सुंदर डोंगर आणि घाटातील रास्ता हा पर्यटकांचे मन मोहून टाकतो . पुण्यात पावसाळ्यात या ठिकाणी एकदा नक्कीच भेट द्यायला हवी.
४. भंडारदरा (Bhandardhara):
भंडारदरा हे एक नयनरम्य ठिकाण आहे. हे निसर्गसौन्दयने सजलेले असून धबधबे ,डोंगरकडे ,हिरवी झाडे ,शुद्ध हवा यांचं आनंद घेता येईल .
५. माळशेज घाट(Malshej Ghat):
माळशेज घाट हे देखील पावसाळी प्रेमींचे अगदी आवडीचे ठिकाण आहे . येथे तुमाला सह्यद्रीच्या लांबच लांब डोंगरकडा पहायला मिळतील .तसेच विविध धबधबे देखील पहिल्या मिळतील.
0 Comments