Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

Twins Village of India:भारतातील या गावात आहेत ३०० हुन अधिक जुळी मुले

Twins Village of India:कधी कधी काही बातम्या आपल्याला अचंबीत करतात . केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यात वसलेले, कोडिन्ही हे गाव इतर कोणत्याही गावापेक्षा वेगळे आहे. "भारताचे जुळे शहर" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावाने शास्त्रज्ञांना गोंधळात टाकले आहे आणि जुळ्या मुलांच्या जन्माच्या असामान्य संख्येमुळे जगाचे लक्ष वेधले आहे.

या गावात २००० कुटूंबामध्ये ४४० हुन अधिक जुळी मुले आहेत . जुळ्या मुलांच्या जन्माच्या जागतिक सरासरीचा विचार करता हा एक उल्लेखनीय आकडा आहे. २००८ मध्ये, ३०० महिलांनी निरोगी बाळांना जन्म दिला आणि त्यापैकी १५ जोड्या जुळी होती . असे दिसून येते की, जुळ्या मुलांचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. 

डॉ. श्रीबिजू म्हणतात कि "माझ्या वैद्यकीय मतानुसार कोडिन्ही गावाच्या हद्दीत सुमारे ३०० ते ३५० जुळी मुले आहेत," गावकरी म्हणतात की जुळ्या मुलांची प्रसूती तीन पिढ्यांपूर्वी सुरू झालीभारतात, विशेषतः आशियामध्ये जुळ्या मुलांचे जन्मदर कमी असल्याने, एका भारतीय गावात जुळ्या मुलांची संख्या जास्त असल्याचे पाहणे आश्चर्यकारक आहे.कृत्रिम गर्भाधानामुळे, विशेषतः पाश्चात्य जगात जुळ्या मुलांचे जन्मदर वाढले आहे. तसेच, जुळ्या मुलांचा जन्म सामान्यतः वयस्कर, प्रौढ महिलांमध्ये होतो. कोडिन्हीमध्ये अस नाही कारण येथे लग्न १८-२० वर्षांच्या वयात खूप कमी वयात होते आणि त्यानंतर लवकरच कुटुंबे सुरू होतात.



जुळ्या मुलांच्या जन्मामागील आणखी एका महत्त्वाच्या कारणावर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, साधारणपणे ५ फूट ३ इंचांपेक्षा कमी उंची असलेल्या महिला जुळ्या मुलांना जन्म देतात. तथापि, कोडिन्हीमधील महिलांची सरासरी उंची ५ फूट आहे.

कोडिन्हीच्या रहिवाशांनी कोडिन्हीच्या जुळ्या मुलांची आणि त्यांच्या कुटुंबियांची नोंदणी करण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी 'ट्विन्स अँड किन्स असोसिएशन' (TAKA) ची अभिमानाने स्थापना केली आहे. 

Post a Comment

0 Comments