बिरदेव चे वडील मेंढपाळ आणि आई गृहिणी आहे .बिरदेव हा लहानपानपासूनच अत्यंत हुशार होता .घराची परिस्तिथी अत्यंत कठीण असूनही तो जिद्दीने शिकला . डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याने कटोरा कष्ट केले . भटक्या जमातीचे जीवन जगात असलेल्या बिरदेव ला अनेक कठीण काळाचा सामना करावा लागला .आपल्या आई वडीलां बरोबर मेंढ्या वळत असताना बिरदेव चा मित्र निशांत देशमुख याचा फोन आला आणि त्याने हो गोड बातमी बिरदेव ला दिली . त्या क्षणी त्याचे आई वडील आणि बहीण यांचे डोळे पाणावून गेले .
गरीब घरात जन्मला आलेल्या बिरदेव चे विचार हे अगदी मोठे होते . त्याला १० वी व १२ वी मध्ये उत्तम गुण मिळाल्या नंतर त्याने पुण्यात अभियांत्रिकी कॉलेजला प्रवेश गेलेला आणि आपले शिक्षण पूर्ण केले . त्याच बरोबर त्याने आपला UPSC चा अभ्यास देखील चालू ठेवला .UPSC चे उत्तम कोचिंग घेणयासाठी तो दिल्ली ला देखील गेला ,मराठी मध्यम मध्ये शिकलेल्या बिरदेव ला इंग्लीश बोलणे नेहमी कठीण जायचे पण त्याने आपला इंग्लिश चा सराव देखील चालू ठेवला आणि इंटरव्हिएव क्रैक केला .
बिरदेव च्या या यशामागे त्याला त्याच्या घरच्यांची हि चांगलीच साथ मिळाली .त्याचा मोठा भाऊ भारतीय सेनेमध्ये आहे. आपल्या भावाची पोलिस बनायची इच्छा होती असे बिरदेव ने सांगितले .आज UPSC ची तयारी करत असलेल्या करोडो मुलांसाठी बिरदेव हा एक आदर्श बनला आहे .
.png)
0 Comments