CSK vs KKR Match Highlight:आज चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांचा सामना रंगला. या सामन्यात चेन्नई च्या टीम ला दारुण पराभव पत्करावा लागला . चेन्नई फकत १०३ धावा बनवल्या आणि ९ विकेट्स गेले .आज अजिंक्य राहणे ची भन्नाट कॅप्टनसी पाहायला भेटली. कोलकाता चे सुपर गोलंदाज सुनील नरेन, वरून चक्राविट्टी आणि मोईन अली तर आज उत्तम गोलंदाजी केली . आणि आपल्या टीम ला विजय मिळवून दिला.केकेआरच्या स्पिंनर्सनि खेळात चांगली कामगिरी केली, तर हर्षित राणा आणि वैभव अरोरा यांनी महत्त्वाचे बळी घेतले.क्विंटन डी कॉकने जलद तीन षटकार मारले. अंशुल कंभोजने डी कॉकला बाद केले.
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) 9 बाद 103 धावांवर कोसळली, जी त्यांची घरच्या मैदानावरची सर्वात कमी आयपीएल धावसंख्या होती. त्यांना सलग पाचवा पराभव पत्करावा लागला, जो त्यांच्या संपूर्ण इतिहासात यापूर्वी कधीही झाला नव्हता आणि ते पॉइंट टेबलमध्ये नवव्या स्थानावर आहेत.
केकेआरने अगदी टार्गेट पूर्ण केलं आणि जवळजवळ दहा षटके शिल्लक असताना विजय मिळवला. केकेआरच्या दमदार अष्टपैलू कामगिरीमुळे सीएसकेला मोठा पराभव पत्करावा लागला.चेन्नई च्या या पराभवानंतर चाहत्यांमध्ये बरीच नाराजी पाहायला भेटली.

0 Comments