Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

Sagar karande viral news :मराठी अभिनेता सागर कारंडेची झाली ६१ लाखांची फसवणूक ......


Sagar karande viral news :सध्याच्या काळात  ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण हे जास्तच वाढलेले आहे . अनेक नागरिक अशा स्कॅमला बळी पडतात . सोसिअल मीडिया आणि बनावट कॉल्स द्वारे अशा फसवणूका होत आहेत . मराठी सिनेसृष्टीतला नामांकित अभियंता सागर कारंडेला सुद्धा असाच एक धक्कादायक अनुभव आला आहे.त्याची तब्बल ६१.८३ लाखांना फसवणूक झाली आहे.

फसवणूक  नेमकी कशी झाली ?

सागर कारंडेला अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअप मेसेज आला. या महिलेने सागरला इन्स्टाग्राम लिंक पाठवली आणि प्रत्येक लाइकसाठी १५० रुपये मिळतील असं सांगितलं. घरबसल्या पैसे कमावण्यात येतील असा दावा करण्यात आला होता. अभिनेत्याने हे काम करण्यास सहमती दर्शवली आणि संबंधित इन्स्टाग्राम पोस्ट लाइक करण्यास सुरुवात केली.

सागरचा विश्वास प्राप्त करणासाठी या सकॅमर्सने त्याला सुरवातीला ११००० रु देखील दिले ,पण त्यानंतर त्याला अधिक कमाई कारणासाठी गुंतवणूक करायला लावली. त्याने सुरवातीला २७ लाख रुपये भरले नंतर जवळ जवळ ६१ लाख रुपये भरल्यावर सुद्धा त्याला एकही रुपया वापस दिला नाही.त्यानंतर सागरनं तात्काळ पोलिसांत धाव घेऊन घडलेला पूर्ण प्रकार सांगितली आणि तक्रार दाखल केली. सध्या सायबर क्राईम विभाग या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. 

सागर कारंडे यावर काय बोलला ?

सागर कारंडे बोलताना म्हणाला की, "मला त्या प्रकरणावर बोलायचं नाही, फेक आहे ते... त्याबद्दल नाही बोलायचं मला." तसेच, याप्रकरणावर गुन्हा दाखल झाला आहे.






Post a Comment

0 Comments