Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

MI vs RCB: रोहित कि विराट कोण मारणार बाजी...

 MI vs RCB who will win:आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर सामना रंगणार आहे . हा सामना मुंबईच्या  आपल्या होम ग्राउंड म्हणजेच वानखडे स्टेडियम वर होणार आहे . विराट आणि रोहित यांची फलंदाजी बघण्यास चाहते बरेच उत्सुक झाले आहेत.मुंबईने आतापर्यंत एकूण 3 सामने गमावले आहेतआणि रॉयल चॅलेंजर्स फकत  १ च सामना गमावला आहे . त्यामुळे मुंबईला  कोणत्याही परिस्थितीत पॉईंट्स टेबल वर आपली जागा टिकवून ठेवण्यासाठी हा सामना जिकंण्याची खूप गरज आहे .

टीम मध्ये काय होतील बदल ?

मुंबईच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या दोघांचा समावेश होणार आहे. रोहित शर्माला दुखापत झाल्याने तो गेल्या काही सामन्यात खेळू शकला नाही परंतु आता त्याची प्रकृती चांगली आहे त्यामुळे तो नक्कीच खेळेल.बुमराह आरसीबीविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असल्याचं हेड कोच महेला जयवर्धने याने सांगितलं आहे. बऱ्याच दिवसानंतर बुमरा ची गोलंदाजी पाहणायसाठी प्रेक्षक उत्सुक  झाले आहेत.

मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन , विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रॉबिन मिन्झ, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर, राज बावा, अश्वनी कुमार, कॉर्बिन बॉश, कर्ण शर्मा, जसप्रीत बुमराह, रीस टोपले, मुजीब उर रहमान, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर आणि कृष्णन श्रीजीथ.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीम: फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा , टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल, सुयश शर्मा, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग, अभिनंदन सिंग, रोमॅरियो शेफर्ड, लुंगी एनगिडी, नुवान तुषारा, मोहित राठी आणि स्वस्तिक चिकारा.

Post a Comment

0 Comments