
Viral Marathi Aaji:आजकाल सोसिअल मीडियावर प्रत्येक व्यक्तीला काहीन काही करावेसे वाटते .पण अगदी थोडेच लोक यात यशस्वी ठरतात आणि आपली एक ओळख बनवतात .अशाच एक आजी सध्या यूट्यूब वर प्रचंड प्रसिद्ध आहेत आणि त्या सध्या लाखो रुपये कमावतात.
सुमन धमाने' या ७० वर्ष्यांच्या आजी सोसिअल मीडियावर सद्या प्रचंड प्रसिद्ध झाल्या आहेत.या आजींचा "आपली आजी" हा यूट्यूब चॅनेल आहे त्याचे सुमारे 1.7 मिलिअन पेक्षा जास्त सुब्स्क्रिबर्स आहेत .या चॅनेल वर त्या आपल्या वेगवेगळ्या पदार्थांच्या रेसिपीएस बनवून टाकतात .
आजींच्या या कामगिरीमागे त्यांचा नातू यश पाठक आहे, ज्याने सर्वकाही शक्य केले. त्याला सुरवातीपासूनच सोसिअल मीडियावर काहीतरी करायची आवड होती .यश एका मुलाखतीती म्हणाला कि "जानेवारीच्या सुमारास, मी माझ्याआजीला माझ्यासाठी पावभाजी बनवायला सांगितले. काही रेसिपी व्हिडिओ पाहिल्यानंतर, तिने सांगितले की ती यापेक्षा चांगली बनवू शकते."आणि तेव्हाच त्याने आपला यूट्यूब चॅनेल सुरु करायचं ठरवलं .
यश म्हणाला कि "मी कारल्याची रेसिपी मार्चमध्ये अपलोड केली . त्याला प्रेक्षक मिळू लागले. अखेर, आम्ही शेंगदाण्याची चटणी, हिरव्या भाज्या, महाराष्ट्रीय गोड पदार्थ, वांगी आणि इतर पारंपारिक खाद्यपदार्थांच्या रेसिपी अपलोड केल्या,".
0 Comments